पाकिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वे क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे.[१][२][३] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[४][५] जुलै २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट ने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[६][७]
२७ नोव्हेंबर रोजी अहमद दानियाल आणि शाहनवाझ दहानी यांना अनुक्रमे हॅमस्ट्रिंगच्या आणि डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले होते, जहाँदाद खान आणि अब्बास आफ्रिदी यांचा संघात समावेश करण्यात आला होता, तर अहमद दानियालला टी२० मालिकेतून वगळण्यात आले आणि बदली म्हणून आमेर जमालचा संघात समावेश करण्यात आला.[१२]