न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड मधील ही पहिली कसोटी आणि वनडे द्विपक्षीय मालिका होती. न्यू झीलंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० ने जिंकली. दुसरा एकदिवसीय सामना द्वितीय कसोटीच्या एका विश्रांतीच्या दिवशी खेळविण्यात आला.