मूलतः, ही स्पर्धा २०२० मध्ये होणार होती, तथापि, जुलै २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुष्टी केली की कोविड-१९ साथीच्या आजारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.[७] ऑगस्ट २०२० मध्ये, आयसीसीने देखील पुष्टी केली की २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया पुनर्रचित स्पर्धेचे आयोजन करेल,[८] टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतात नियोजित होता,[९] परंतु नंतर तो युएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आला.[१०] १५ नोव्हेंबर २०२१ रोजी, आयसीसीने सामन्यांचे आयोजन करणाऱ्या ठिकाणांची यादी जाहीर केली.[११] तर अंतिम सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट मैदानची घोषणा करण्यात आली.[१२] इंग्लंडच्या संघाने आदल्या दिवशी मरण पावलेल्या डेव्हिड इंग्लिश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या हातपट्ट्या बांधल्या होत्या.[१३]