श्रीलंकेमध्ये १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान पार पडेलली चवथी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वेस्ट इंडीजने जिंकली.[१][२][३] आशिया खंडातील ही पहिलीच टी२० विश्वचषक स्पर्धा, या आधीच्या तीन स्पर्धा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये झाल्या होत्या. श्रीलंकेचा तेजगती गोलंदाज लसिथ मलिंगा ह्याला आयसीसीतर्फे या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यात आले. [४] स्पर्धेच्या स्परूपानुसार प्राथमिक फेरीत प्रत्येकी तीन देशांचे चार गट होते. भारत आणि इंग्लंडच्या 'अ' गटात आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, अफगाणिस्तान होता. पात्रता फेरीतील विजेता संघ आयर्लंड, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या 'ब' गटात होता. 'क' गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे, तर 'ड' गटात पाकिस्तान, न्यू झीलंड आणि बांगलादेशचा समावेश होता. [५]
सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने २१ सप्टेंबर २०११ रोजी जाहीर केले. [२] आणि त्याच दिवशी त्यांनी स्पर्धेचा लोगो "मॉडर्न स्पिन"चे सुद्धा अनावरण केले.[६]
पार्श्वभूमी
२०१२ विश्व ट्वेंटी२० ही ट्वेंटी२० स्पर्धेची चवथी आवृत्ती आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या स्पर्धेतील चित्तथरारक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून ट्वेंटी२० जेतेपद मिळवले होते. परंतु २००७ मधल्या अंतिम सामन्यातील पराभूत पाकिस्तानने इंग्लंडमध्ये पार पडलेला, २००९चा टी२० विश्वचषक श्रीलंकेचा पराभवकरून जिंकून घेतला. वेस्ट इंडीज मधील २०१० टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंडने जिंकला होता.[७]
स्वरूप
२०१० च्या ट्वेंटी२० विश्वचषका प्रमाणेच ह्या विश्वचषकाचे स्वरूप होते. प्राथमिक फेरीतील चार गटांमध्ये कसोटी खेळणाऱ्या दहा देशांसोबत दोन असोसिएट देशांचे संघ होते, जे संयुक्त अरब अमिरातीमध्ये १३-२४ मार्च २०१२ दरम्यान झालेल्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ फेरीतून पात्र ठरले होते.
'अ' ते 'ड' गटामधील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर ८ फेरीमध्ये गट १ आणि २ मध्ये खेळले. सुपर ८ मधल्या दोन गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
सुपर ८ मधल्या गट १ मध्ये गट अ आणि क मधील अव्वल मानांकन असलेले संघ तसेच गट ब आणि ड मधील दुसरे मानांकन असलेल्या संघांचा समावेश होता, गट २ मध्ये गट ब आणि ड मधील अव्वल मानांकन असलेले संघ तसेच गट अ आणि क मधील दुसरे मानांकन असलेल्या संघांचा समावेश होता. स्पर्धेच्या सुरुवातीला संघांना मानांकने दिली गेली होती, ज्यावर गट फेरीतील निकालांचा काहीही परिणाम होणार नव्हता. जर बिगरमानांकित संघाने मानांकन असलेल्या संघाला बाद केले तर बाद झालेल्या संघाचे मानांकन त्यांना बहाल करण्याची तरतूद होती. [८]
गट फेरी आणि सुपर ८ मध्ये दिले जाणारे गुण खालील प्रमाणे:
निकाल
गुण
विजय
२ गुण
अनिर्णित/रद्द
१ गुण
पराभव
० गुण
स्पर्धेच्या कोणत्याही सामन्यात बरोबरी झाल्यास सुपर ओव्हरच्या मदतीने विजयी संघ निवडण्यात येईल. [९]
गट फेरी किंवा सुपर ८ फेरीमधील प्रत्येक गटातील संघांना खालील निकषांवर क्रमांक दिले गेले:[१०]
सर्वाधिक गुणसंख्या
समान असल्यास, सर्वाधिक विजय
तरीही समान असल्यास, उच्च निव्वळ धावगती
तरीही समान असल्यास, कमीत कमी गोलंदाजी स्ट्राइक रेट.
तरीही समान असल्यास, एकमेकांसोबतच्या सामन्याचा निकाल.
आयसीसीच्या विकास समितीने विश्व ट्वेंटी२० साठी जागतिक पात्रता प्रणाली वाढवली, ज्यामुळे नियामक मंडळाच्या सहकारी आणि संलग्न सभासदांना स्पर्धेत सहभागी होण्याची संघी प्राप्त झाली. फेब्रुवारी २०१० मधील आठ संघांसहित एकूण १६ संघ २०१२ मध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत लढले.
अंतिम सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून पात्रता फेरीचे जेतेपद मिळवले आणि दोन्ही संघ २०१२ ट्वेंटी२० विश्व चषकासाठी पात्र ठरले.
स्थळे
सर्वच्या सर्व सामने खालील तीन मैदानांवर खेळवले गेले:
या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड सुपर ८ फेरी साठी पात्र आणि बांगलादेश स्पर्धेतून बाद
१७५/६ ही बांगलादेशची आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सर्वोच्च धावसंख्या.(याआधी वेस्ट इंडीज विरुद्ध १६५/३)
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील पाकिस्तानचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग [१४]
बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील सर्वोच्च यशस्वी पाठलाग
शकिब अल हसनच्या ५४ चेंडूत ८४ धावा ही कोणत्याही फलंदाजाच्या पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील सर्वोत्तम कामगिरी.[१५]
सुपर ८ फेरी
स्पर्धेच्या सुरुवातीला संघांना मानांकने दिली गेली होती, ज्यावर गट फेरीतील निकालांचा काहीही परिणाम होणार नव्हता. जर बिगरमानांकित संघाने मानांकन असलेल्या संघाला बाद केले तर बाद झालेल्या संघाचे मानांकन त्यांना बहाल करण्याची तरतूद होती.[८]
उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक खेळी केल्यानंतर, अंतिम सामन्यात मात्र ख्रिस गेल अवघ्या ३ धावांवर बाद झाला आणि त्या वेळी ५.५ षटकांत वेस्ट इंडीजची धावसंख्या होती २ बाद १४. त्यानंतर मार्लोन सॅम्युएल्सने ५५ चेंडूंत ७८ धावांची वेगवान खेळी केली, ज्यामध्ये स्पर्धेतील सर्वात लांब १०६ मी.चा षट्कार समाविष्ट होता त्यासोबतीला कर्णधार डॅरेन सामीच्या १५ चेंडूंतील २६ धावांच्या खेळीमुळे ११ ते २० षटकांदरम्यान वेस्ट इंडीजने १०८ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेला ८ षटकांमध्ये ३९/१ असा आवर घातला. श्रीलंकेचे दोन फलंदाज धावचीत झाले आणि त्यांच्यातर्फे सर्वाधिक ३३ धावा केल्या त्या कर्णधार महेला जयवर्धनेने. नुवान कुलसेकराने शेवटी १६ चेंडूंत २६ धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतू, तळाच्या फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत आणि श्रीलंका विजयी लक्ष्यापासून ३६ धावा दूर रहिली. सॅम्युएल्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, त्याने सामन्यात सर्वाधिक ७८ धावा केल्या तसेच चार षटकांत फक्त १५ धावा देऊन एक बळी घेतला.
वेस्ट इंडीजचा हा विजय २००४ आयसीसी चॅम्पियनशीप नंतर पहिलाच आयसीसी स्पर्धेतील विजय तर १९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतरचे पहिलेच आयसीसी जगज्जेते पद. तसेच आयसीसीच्या सर्वच्या सर्व तीन जागतिक स्पर्धा (विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्व ट्वेंटी२०) जिंकणारा हा भारताशिवाय दुसराच संघ.