पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली.
ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयामुळे पाकिस्तानला ट्वेंटी२० मालिकेत व्हाइटवॉश देण्याचे न्यू झीलंडचे स्वप्न भंग झाले. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.