दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. आयर्लंडने खेळलेले हे पहिले आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे सामने होते.
दक्षिण आफ्रिकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. महिला वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-० ने अभूतपूर्व विजय मिळवला.