व्हायकिंग लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली. १७व्या शतकापासून डब्लिनची झपाट्याने वाढ झाली व त्या काळी डब्लिन हे ब्रिटिश साम्राज्यामधील दुसरे मोठे शहर मानले जात असे. इ.स. १९२२ मधील आयर्लंडच्या फाळणीनंतर डब्लिन हे आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचे राजधानीचे शहर बनले.
सध्या डब्लिन शहराची लोकसंख्या ५.२५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख आहे. आयर्लंडचे सांस्कृतिक केंद्र असलेले डब्लिन शहर जगातील ३० सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते.[२][३]