व्हियेना किंवा वीन (जर्मन: Wien) ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी, ऑस्ट्रिया या देशातील ९ राज्यांपैकी एक राज्य व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या व्हियेना शहराची लोकसंख्या सुमारे १७.१४ लाख असून त्याच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २४ लाख लोक (ऑस्ट्रियाच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के) राहतात. व्हियेना शहर चेक प्रजासत्ताक, हंगेरी व स्लोव्हाकिया देशांच्या सीमेजवळ असून येथून ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी केवळ ६० किमी अंतरावर आहे.
इ.स.पू. ५व्या शतकापासून व्हियेना उल्लेख इतिहासात आहे. याचे मूळ नाव उइंदोबोना असे होते. इतिहासपूर्व रोमन साम्राज्यकाळात वसवण्यात आलेले व्हियेना शहर मध्य युगात ऑस्ट्रियन साम्राज्याची व नंतर ऑस्ट्रिया-हंगेरीची राजधानी होती. सध्या एक प्रगत व आधुनिक दर्जाचे शहर असलेल्या व्हियेनामध्ये ओपेकचे मुख्यालय तसेच संयुक्त राष्ट्रांची अनेक कार्यालये आहेत.
इतिहास
इसवीसनपूर्व ५०० वर्षांपासून व्हियेनाच्या परिसरात मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. जर्मन आदिवासी टोळ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून रोमनांनी इसवीसनपूर्व १५ मध्ये शहराभोवती सुरक्षाभींत बांधली. या शहराला रोमन विंदोबोना म्हणत असत.
भूगोल
अर्थव्यवस्था
जनसांख्यिकी
वाहतूक
व्हियेनामधील नागरी वाहतूक दृतगतीमार्ग, रेल्वे व जलद परिवहनावर अवलंबून आहे. भुयारी जलद वाहतूकीसाठी व्हियेना ऊ-बान तर मेट्रोसेवेसाठी व्हियेना एस-बान ह्या दोन रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. येथील ट्रामसेवा जगातील सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीची आहे. ऱ्हाईन-माइन-डॅन्यूब कालव्याद्वारे व्हियेनापासून जर्मनीमधील बहुसंख्य औद्योगिक शहरांपर्यंत जलवाहतूक सुलभ आहे.
अर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन हे ऑस्ट्रियामधील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम व्हियेनामध्येच असून देशामधील अनेक लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. युएफा यूरो २००८ स्पर्धेमधील ८ यजमान शहरांपैकी व्हियेना एक होते. फुटबॉल व्यतिरिक्त आईस हॉकी हा खेळ देखील येथे लोकप्रिय आहे.
शिक्षण
जुळी शहरे
व्हिएन्नाचे खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.