बुखारेस्ट (रोमेनियन: București; उच्चार) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.
१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती.[१] बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात.[२][३] ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.[४]
इतिहास
इ.स. १४५९ साली सर्वप्रथम उल्लेखले गेलेले बुखारेस्ट शहर १७व्या शतकाच्या सुरुवातीस ओस्मानी साम्राज्याने जाळून टाकले होते. त्यानंतर अनेक वेळा ह्या शहराचे नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाले व पुनर्बांधणी करण्यात आली. १८६२ साली बुखारेस्ट रोमेनियाचे राजधानीचे शहर बनले. जानेवारी १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्याननाझी जर्मनीच्यालुफ्तवाफे हवाई दलाने केलेल्या बॉंब हल्ल्यात बरेचसे बुखारेस्ट बेचिराख झाले होते. युद्ध संपल्यानंतर स्थापन झालेल्या कम्युनिस्ट रोमेनियाच्या राजवटीखाली बुखारेस्ट पुन्हा बांधण्यात आले व येथील कला व संस्कृतीचे पुनरुज्जिवन झाले. निकोलाइ चाउसेस्कुने बुखारेस्टमधील अनेक ऐतिहासिक भाग जमीनदोस्त करून तेथे साम्यवादी रचनेच्या इमारती बांधल्या. इ.स. २००० नंतर बुखारेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे व सध्या येथील सुविधा अद्ययावत आहेत.
भूगोल
बुखारेस्ट शहर रोमेनियाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर २२६ वर्ग किमी क्षेत्रफळावर वसले आहे. बुखारेस्ट परिसरात अनेक नैसर्गिक सरोवरे आहेत.
बुखारेस्टमध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर आहे. ओटोपेनी या गावाजवळ असलेला हा विमानतळ रोमेनियातील सगळ्यात व्यस्त विमानतळ असून २०१३मध्ये येथून ७६,४३,४६७ प्रवाशांनी येजा केली. ऑरेल व्लैचू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहराच्या मध्यवर्ती भागापासून ८ किमी अंतरावर असलेला छोटा विमानतळ आहे.
अर्थकारण
जुळी शहरे
खालील शहरांचे बुखारेस्टसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.