ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८७ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा हा पहिला आयर्लंड दौरा होता. आयर्लंड महिलांनी या मालिकेद्वारे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. यजमान आयर्लंडचे नेतृत्व मेरी-पॅट मूरने केले तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार लीन लार्सेन होती. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियन महिलांनी ३-० ने जिंकली.
आयर्लंडविरुद्ध मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ ३ महिला कसोटी आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- आयर्लंड महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- उत्तर आयर्लंडमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या दोन्ही देशांनी उत्तर आयर्लंडमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- डोन्ना आर्मस्ट्राँग, सुझॅन ब्रे, ग्रॅनी क्लँसी, मिरियम ग्रीली, राचेल हार्डीमान, मेरी-पॅट मूर, ॲन मरे, एलिझाबेथ ओवेन्स, सोनिया रीम्सबॉटम, ॲलीस स्टॅन्टन आणि पामेला ट्रोहियर (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- या आधी आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून खेळल्यानंतर जेनी ओवेन्स हिने या सामन्याद्वारे ऑस्ट्रेलिया महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- आयर्लंडमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने आयर्लंडमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- स्टेल्ला ओवेन्स (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे |
---|
संपुर्ण सदस्यांचे दौरे |
ऑस्ट्रेलिया महिला | |
---|
इंग्लंड महिला | |
---|
संपुर्ण सदस्यांच्या स्पर्धा |
असोसिएट सदस्यांचे दौरे |
असोसिएट सदस्यांच्या स्पर्धा |