झारखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्याझारखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
२००० साली झारखंड बिहार राज्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून आजवर ६ व्यक्ती झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
^येथे केवळ मुख्यमंत्र्याचा राजकीय पक्ष देण्यात आला आहे.
^ abcराज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[२]