हेमंत सोरेन (१० ऑगस्ट, १९७५ - हयात) हे भारत देशाच्या झारखंड मुक्ति मोर्चा ह्या पक्षातील एक राजकारणी व झारखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. डिसेंबर २०१९ पासून ह्या पदावर असणारे हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने यश मिळवले व सोरेन मुख्यमंत्रीपदावर आले.
संदर्भ