पिनाराई विजयन (मल्याळम: പിണറായി വിജയൻ; २१ मार्च १९४४) हे एक भारतीय राजकारणी व केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. आघाडीच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
केरळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले विजयन १९९८ ते २०१५ दरम्यान कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे सरचिटणीस होते. त्यांनी १९९६ ते १९९८ दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्रीपद देखील भुषवले आहे.
वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवन
विजयन यांचा जन्म २४ मे १९४५ला केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील पीनाराई येथे जी कोरान आणि कल्याणी यांच्या पोटी झाला .ते एकूण १४ भावंडे होते त्या पैकी ३भावंडे जिवंत आहेत. त्यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १ वर्ष हातमाग विणकाम केले . त्यानंतर त्यांनी विश्वविद्यालयातील गव्हर्मेंट ब्रेंनेन कॉलेज थलासरी, येथुन त्यांनी बी. ए.(अर्थशास्त्र) पदवी प्राप्त केली.[१][२]
त्यानंतर त्यांनी कमला विजयन यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुलं आहे .
आणि त्यांची पत्नी ही निवृत्त शिक्षिका आहे .
संदर्भ