ऑस्ट्रेलियाने पहिले दोन ट्वेंटी२० सामने जिंकत मालिका जिंकली. श्रीलंकेने तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात कर्णधार दासून शनाकाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ गडी राखून विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाने पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. श्रीलंकेने पुढचे तीन वनडे जिंकत १९९२ नंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने पाचवा सामना ४ गडी राखून जिंकला. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी जिंकली. श्रीलंकेने दुसरी कसोटी १ डाव आणि ३९ धावांनी जिंकली आणि कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दिनेश चंदिमल याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले द्विशतक झळकावले तर १२/११७ ही प्रभात जयसुर्याने श्रीलंकेतर्फे पदार्पणात केलेली सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरली.