सिद्दिपेट हा भारताच्यातेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. करीमनगर आणि वरंगल जिल्ह्यांचा काही भाग जोडून पूर्वीच्या मेदक जिल्ह्यापासून सिद्दीपेट जिल्हा तयार करण्यात आला आहे. हा जिल्हा तेलंगणाच्या मध्य भागात असून ह्या जिल्ह्याचा काही भाग हैद्राबाद महानगरामध्ये मोडतो. सिद्दिपेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[२]
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या सिद्दिपेट जिल्ह्याची लोकसंख्या १०,१२,०६५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १००८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.६१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १३.७४% लोक शहरी भागात राहतात.