खम्मम जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,३६१ चौरस किलोमीटर (१,६८४ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा सूर्यापेट, महबूबाबाद, भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश राज्यासह आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्व भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. गोदावरी ही येथून वाहणारी प्रमुख नदी आहे.
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्याखम्मम जिल्ह्याची लोकसंख्या १४,०१,६३९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.९५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २२.६% लोक शहरी भागात राहतात. [१]
खम्मम जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[२]