करीमनगर हा भारताच्यातेलंगणाराज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निजाम काळात, सय्यद करीमुद्दीन नावाच्या एलगंडाला किलादाराने गावास करीमनगर हे नाव दिले होते. करीमनगर हे एक प्रमुख नागरी समूह आणि राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.[१][२]
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या करीमनगर जिल्ह्याची लोकसंख्या १०,०५,७११ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६९.१६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३०.७२% लोक शहरी भागात राहतात. करीमनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[३]