मुलुगु जिल्हा हा भारताच्या तेलंगणाराज्यातील राज्यातील जिल्हा आहे. मुलुगु येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
१७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु जिल्ह्यासह नारायणपेट जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तेलंगणा राज्यातील जिल्हा्यांची संख्या एकूण ३३ झाली.[१][२]
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मुलुगु जिल्ह्याची लोकसंख्या २,९४,६७१ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६३.५७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ५% लोक शहरी भागात राहतात.