महबूबाबाद जिल्हा हा भारताच्या तेलंगणाराज्यातील राज्यातील जिल्हा आहे. महबूबाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचनेनंतर महबूबाबाद जिल्हा हा पूर्वीच्या वारंगल जिल्ह्यापासून बनलेला आहे. जिल्ह्यातील कुरवी वीरभद्र स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे
बय्यारम आणि गार्ला या मंडळांमध्ये लोहखनिज आणि कोळशाचे भरपूर साठे आहेत.
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या महबूबाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ७,७४,५४९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५७.१३% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ९.८६% लोक शहरी भागात राहतात.
जिल्ह्यात लंबाडा अनुसूचित जमातींची लक्षणीय लोकसंख्या आहे, त्यांची संख्या सुमारे ३७.८% आहे तर अनुसूचित जाती सुमारे १३.५% आहेत.