संगारेड्डी हा भारताच्यातेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.[२] २०१६ साली मेडक जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. २०११ साली संगारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १५.२७ लाख इतकी होती. हा जिल्हा तेलंगणाच्या पश्चिम भागात कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून ह्या जिल्ह्याचा काही भाग हैद्राबाद महानगरामध्ये मोडतो. राष्ट्रीय महामार्ग ६५ व राष्ट्रीय महामार्ग १६१ संगारेड्डी जिल्ह्यामधून धावतात. संगारेड्डी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
२०१६ मध्ये जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर संगारेड्डी जिल्हा मेदक जिल्ह्यापासून विभाजित झाला आहे; मेडक जिल्हा तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. ते आहेत संगारेड्डी जिल्हा,मेदक जिल्हा,सिद्दिपेट जिल्हा.
निजामाच्या काळात मेदकचा शासक राणी शंकरम्मा यांचा मुलगा सांगा या शासकाच्या नावावरून हे नाव देण्यात आले.
संगारेड्डी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,४६४ चौरस किलोमीटर (१,७२४ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा मेदक, मेडचल, विकाराबाद, कामारेड्डी आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसह आणि कर्नाटक राज्याच्या सीमेसह आहेत.
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या संगारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,६२८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६५ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६४.०८% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३४.६९% लोक शहरी भागात राहतात.
२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७१.९७% लोक तेलुगू, १५.६३% उर्दू, ५.०३% लंबाडी, ३.८४% कन्नड, १.७६% हिंदी आणि १.३२% मराठी भाषा बोलत होते.