२ जून-२०१४ पर्यंत निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाल्यानंतर निजामाबाद जिल्हा तेलंगणा राज्याच्या जिल्ह्यांपैकी एक बनला.
या जिल्ह्याचे नाव निजामाबाद (निजाम-ए-अबादी) हे हैदराबादच्या निजाम असफ जाही, सहावा याच्या नावावरून पडले, ज्याने १८ व्या शतकात दख्खनवर राज्य केले होते, मूळतः जिल्याला इंदूर असे म्हणतात, जे राजा इंद्रदत्त याच्या नावावरून प्रचलित होते ज्याने ५ व्या शतकात या प्रदेशावर राज्य केले.
जनगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,२८८ चौरस किलोमीटर (१,६५६ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा जगित्याल, राजन्ना सिरिसिल्ला, निर्मल, कामारेड्डी जिल्ह्यांसह आणि महाराष्ट्राच्या राज्य सीमेतील नांदेड जिल्ह्यासह आहेत. गोदावरी नदी निजामाबाद जिल्ह्यातून कंदकुर्ती येथे तेलंगणात प्रवेश करते.
पर्यटन
श्रीराम सागर प्रकल्प
अलीसागर जलाशय
अशोक सागर
कंदकुर्ती, तडपकल आणि पोचमपाड
लिंबाद्री नरसिंहस्वामी मंदिर
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जनगांव जिल्ह्याची लोकसंख्या १५,७१,०२२ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०४४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६४.२५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २९.५८% लोक शहरी भागात राहतात.
२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७१.६२% लोक तेलुगू, १८.२१% उर्दू, ५.६५% लंबाडी आणि २.१६% मराठी भाषा बोलत होते.