१९६२ सालापासून खेळवण्यात आलेली ही शर्यत सेपांग येथे १९९९ सालापासून खेळवली जात आहे.
सर्किट
थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट
थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट हे एक फॉर्म्युला टु शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे सिंगापूर देशातील थॉमसन रोड भागात स्थित आहे. इ.स. १९६२ ते इ.स. १९६५ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री मधिल फॉर्म्युला टु शर्यती खेळवल्या गेल्या कारण सिंगापूर हा मलेशिया देशाचा भाग होता. इ.स. १९६५ मध्ये सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवले, तरीसुद्दा इ.स. १९७३ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री आयोजित करण्यात आली.
शाह आलम सर्किट
शाह आलम सर्किट हे एक फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेसींग सर्किट आहे, जे मलेशिया देशातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी, शाह आलम परिसरात आहे. सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवल्यावर, थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट सिंगापूर अधिकारक्षेत्रामध्ये गेले. त्यामुळे नवीन सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट तैयार हो पर्यंत, इ.स. १९६८ पासून इ.स. १९९५ पर्यंत, मलेशियन ग्रांप्री या सर्किटवर आयोजित करण्यात आली. या मध्ये तस्मान सीरीज (१९६८-१९७२)[१], फॉर्म्युला पॅसिफिक (१९७४-१९७४, १९७८,१९८२), फॉर्म्युला अटलांटिक (१९७५) आणि फॉर्म्युला होल्डेन (१९९५) शर्यतींचा समावेश आहे.
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक सेपांग, मलेशिया मधील फॉर्म्युला वन सर्किट आहे. ते क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ स्थित आहे, जे क्वालालंपूर शहरापसुन ४५ कि.मी दुर आहे. येथे २०१७ पर्यंत फॉर्म्युला वन मलेशियन ग्रांप्री आयोजीत केली जाते व ईतर शर्यती सुद्दा आयोजीत केल्या जातात..