२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]
† सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
हंगामाचे वेळपत्रक
२००९ साली एकूण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरू असलेल्या कॅनेडियन ग्रांप्री व फ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले. ‡२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले. ‡२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.