२०१९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ७०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ डिसेंबर २०१९ रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
२०१९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
पहिल्या दहा वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवनाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण देण्यात आले:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[टीप ५] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[टीप ६]
जर चालक शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत झाला असेल तरच त्याला सर्वात जलद फेरीचे गुण देण्यात आले. केविन मॅग्न्युसेन ने सिंगापूर ग्रांप्री आणि वाल्टेरी बोटास ने ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये सर्वात जलद फेरीचे नोंद केले, पण त्यांना या प्रणाली प्रमाणे गुण नही देण्यात आले कारण ते दोघे शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत नाही होते.
डॅनिल क्व्याट आणि निको हल्केनबर्ग यांनी समान गुणांसह हंगाम संपविल्यामुळे, "काउंट-बॅक" प्रणालीचा वापर करुण टायब्रेकर सोडवण्यात आला. चालकाचा "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीचा वापर करुण गुण देण्यात आले. ज्यामुळे डॅनिल क्व्याटचा निकाल तिसऱ्या स्थानावर आणि निको हल्केनबर्गचा निकाल पाचव्या स्थानावर ठरवण्यात आला.
^फेरारी entered rounds २–६ and rounds १७–२१ as "स्कुदेरिआ फेरारी Mission Winnow".[१]
^Haas entered rounds १-१४ as "Rich Energy हास एफ.१ संघ", but following the termination of the sponsporship agreement with Rich Energy before the २०१९ सिंगापूर ग्रांप्री, they entered rounds १५–२१ as "हास एफ.१ संघ".[२]
^रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ uses मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ power units. For sponsorship purposes, these engines are rebadged as "BWT मर्सिडीज-बेंझ".[३]
^मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but received a three-place grid penalty for failing to slow for a yellow flag. चार्ल्स लेक्लर्क was promoted to pole position in his place.[१८]
^जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[१९]
^जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[१९]