ग्लोब लाइफ फील्ड हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आर्लिंग्टन शहरातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या टेक्सास रेंजर्स संघाचे घरचे मैदान आहे. [१] याची आसनक्षमता ४०,३०० इतकी आहे.
ग्लोब लाइफ अँड ॲक्सिडेंट इन्शुरन्स कंपनीने २०४८पर्यंत या मैदानाला आपले नाव देण्याचा करार केला आहे. [२] [३]
बेसबॉलखेरीज येथे क्वचित नॅशनल फायनल रोडियो, कॉलेज फुटबॉल सामने, संगीतमैफली तसेच मुष्टियुद्धाच्या लढती होतात. [४]
संदर्भ