रिगली फील्ड हे अमेरिकेच्याइलिनॉय राज्यातील शिकागो शहरात असेलले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्याशिकागो कब्स संघाचे घरचे मैदान आहे. रिगली फील्डची रचना १९१४मध्ये त्यावेळेसच्या फेडरल लीगमधील शिकागो व्हेल्स संघासाठी करण्यात आली होती. त्यावेळी या मैदानाला वीघमन पार्क असे नाव होती. रिग्ली कंपनी या च्युइंग गम बनविणाऱ्या कंपनीच्या मालक विल्यम रिग्ली जुनियरने १९२१मध्ये कब्स आणि पर्यायाने हे मैदानही विकत घेतले. त्यावेळी याचे नाव कब्स पार्क असे ठेवले गेले. १९२७मध्ये याा रिगली फील्ड असे नाव दिले गेले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४१,६४९ इतकी आहे.