चेझ फील्ड तथा बँक वन बॉलपार्कअमेरिकेच्याॲरिझोना राज्यातील फीनिक्स शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्याॲरिझोना डायमंडबॅक्स संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानाची बांधणी १९९८मध्ये झाली. याच वर्षी डायमंडबॅक्स संघाने मेजर लीग बेसबॉलमध्ये पदार्पण केले. या मैदानाला छत असून ते पाहिजे तेव्हा उघडता किंवा बंद करता येते.
बँक वनने १९९८मध्ये या मैदानाला ३० वर्षे आपले नाव देण्यासाठी १० कोटी डॉलर दिले. बँक वन जेपीमॉर्गन चेझ अँड कंपनीमध्ये विलीन झाल्यावर मैदानाचे नाव बदलून चेझ फील्ड ठेवले गेले. [१]