गॅरंटीड रेट फील्ड (पूर्वीचे कॉमिस्की पार्क तथा यूएस सेल्युलर फील्ड) हे अमेरिकेच्याइलिनॉय राज्यातील शिकागो शहराच्या दक्षिण भागात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो व्हाईट सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे. हे मैदान इलिनॉय राज्याच्या मालकीचे असून अमेरिकेतील व्यावसायिक खेळांच्या मैदानांपैकी सार्वजनिक मालकीच्या मोजक्या अशा मैदानांपैकी एक आहे. याची बांधणी १९९१मध्ये १३ कोटी ७० लाख डॉवर खर्चाने केली गेली. त्यावेळी त्याला कॉमिस्की पार्क असे नाव होते.
या मैदानाची आसनक्षमता ४४,३२१ इतकी आहे.
२००३मध्ये शिकागोमधील दूरसंचार कंपनी यूएस सेल्युलरने ६ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाचे नाव २० वर्षांसाठी यूएस सेल्युलर फील्ड असे करून घेतले. [१] तेराच वर्षांनी यूएस सेल्युलरने १ कोटी ३० लाख डॉलर देउन हा करार रद्द केला आणि सुमारे १ कोटी डॉलर देणे टाळले. [२] यानंतर २०१६मध्ये खाजगी निवासी तारण कंपनी गॅरंटीड रेटने १३ वर्षे आपले नाव देण्याचा करार केला. यासाठी पहिल्या १० वर्षांत २ कोटी डॉलर दिले जातील [३][४][५]