ट्रॉपिकाना फील्ड अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील बहुउद्देशीय मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या टँपा बे रेझचे घरचे मैदान आहे. या शिवाय महाविद्यालयीन फुटबॉल देखील येथे खेळले जाते. या मैदानाला छत आहे आणि ते उघडता येत नाही.
या मैदानाची रचना १८८९मध्ये फ्लोरिडा सनकोस्ट डोम नावाने झाली. टॅम्पा बे लाइटनिंग संघ येथे आल्यावर त्याला थंडरडोम[१] असे नावदिलेगेले. १९९६मध्ये या मैदानाला सध्याचे नाव दिले गेले.
सध्याच्या परिस्थितमध्ये ट्रॉपिकाना फील्ड हे मैदान अगदी भिकार अवस्थेत असल्याचे समजले जाते. ओकलंड कोलिझियम सोबत, हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते[२][३][४]