डॉजर स्टेडियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस डॉजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची निर्मिती १९६२मध्ये झाली. बॉस्टनच्या फेनवे पार्क आणि शिकागोच्या रिगली फील्डनंतर एमएलबीमधील हे सगळ्यात जुने मैदान आहे. [१][२] आसन क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे बेसबॉल मैदान आहे. [३]
है मैदान १९६२-६५ दरम्यान लॉस एंजेलस एंजेल्स संघाचेही घरचे मैदान होते. त्यावेळी त्याला शावेझ रेव्हिन स्टेडियम असे नाव होते.