आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्याटेक्सास राज्यातील एक शहर आहे. आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर[१] असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.