जपान (भारत स्वतंत्र करण्यासाठी जपानच्या मदतीने उभारलेले सैन्य)
विभाग
पायदळ
आकार
सुमारे ४३,०००
ब्रीदवाक्य
और कुरबानी
आझाद हिंद फौज (Indian National Army) ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.[१]
भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.
जानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.
हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.
मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.
जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरू केली.
1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.
जर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.