मोतीलाल नेहरू

पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दासलाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. १९२८ साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच १९२८मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूपराणी असे होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्ष्मी होते, ज्या पुढे विजयालक्ष्मी पंडित म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा (हाथीसिंग) होते.

मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद येथे राजवाड्याप्रमाणे एक प्रशस्त घर घेतले होते. त्या घराचे नाव आनंद भवन असे होते. पुढे त्यांनी हे घर काँग्रेस पक्षाला देऊन टाकले.

मोतीलाल नेहरूंचे निधन १९३१ साली अलाहाबाद येथे झाले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!