बहादूरशहा जफर हा १८५७ च्या उठावाच्या वेळी पूर्ण चळवळीचे नेतृत्व करीत होता. त्यावेळी तो दिल्लीचा नवाब होता. यास मंगल पांडे , तात्या टोपे, झाशीची राणी, १८४९ साली निवर्तलेल्या पंजाबच्या रणजीतसिंह या राजाच्या पत्नीने देखील पाठिंबा दिला होता. भारतातील तमाम संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्व राजांच्या मनातही असंतोष खदखदत होता व अशा राजांनीही १८५७ च्या उठावास सक्रिय पाठिंबा दिला होता. यावेळी संस्थानांची अवस्था बिकट होती. या सर्व कारणांमुळे स्फोट होणे साहजिकच होते म्हणून उठावाचे केंद्र दिल्ली असावे असे ठरले. त्यावेळी बहादूरशहा जफर हा नवाब असल्याने त्यांच्याकडे हे नेतृत्व आले. यावेळी त्याचे वय 82 होते.
[ संदर्भ हवा ]