दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी दोर्डी
दादाभाई नौरोजी

ब्रिटनमधील खासदार
कार्यकाळ
इ.स. १८९२ – इ.स. १८९५
मागील फ्रेडरिक थॉमस पेंटोन
पुढील विल्यम फ्रेडरिक बार्टन मस्से-मेंवरिंग

जन्म ०४ सप्टेंबर १८२५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून ३०, इ.स. १९१७
महालक्ष्मी ,मुंबई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई माणकबाई नौरोजी दोर्डी
वडील नौरोजी पालनजी दोर्डी
पत्नी गुलबाई
निवास लंडन युनायटेड किंग्डम
व्यवसाय बॅरिस्टर
धर्म पारशी

दादाभाई नौरोजी (रोमन लिपी: Dadabhai Naoroji ;) (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूमदिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

ओळख

ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.

मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.

रस्ता

मुंवईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईंची शाळा आहे.

जीवन प्रवास

१८४५ - स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. १८८५ - भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. १८८६, १८९३ व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद. ज्ञान प्रसारक मंडळींची स्थापना, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, लंडन इंडियन असोशिएशन, आणि ईस्ट इंडिया असोशिएशनची स्थापना.

बाह्य दुवे

  • "डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट" (इंग्रजी भाषेत).

दादाभाई नौरोजींवरील पुस्तके

  • दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)
  • दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)
  • नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)
  • भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!