सीना धरण

सीना धरण
अधिकृत नाव सीना धरण
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
सीना नदी
स्थान कर्जत(अहमदनगर)
लांबी १५८०मी
उंची २८.५मी
बांधकाम सुरू इ.स. १९८६
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय मातीकाम
क्षमता 52.30 दशलक्ष घन मीटर
जलसंधारण क्षेत्र १५८ हजार हेक्टर
क्षेत्रफळ १२८३४ वर्गमीटर
संकेतस्थळ http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=Sina_D02841

सीना धरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा या गावात असून या ठिकाणी उपयुक्त जलसाठा 1.89TMC असून मृत साठ्या सहित या धरणाची क्षमता 3TMC इतकी आहे.

हे धरण पूर्णपणे भरल्यास कर्जत जामखेड या मतदार संघातील बहुतांश गावांचा शेती प्रश्न सुटतो, हा भाग दुष्काळी असल्या कारणाने पाऊस कधी पडतो कधी नाही.यामुळे धरण भरण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कुकडीच्या पाण्यावर अवलंबुन राहावे लागते.कुकडी प्रकल्पातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यास ह्या क्षेत्राला फायदा होतो. कुकडी प्रकल्पात एकूण पाच धरणे आहेत डिंभे,माणिकडोह,पिंपळगाव जोगे,वडज व येडगाव. ही सर्व धरणे पुणे जिल्ह्यात असून कुकडी नदीच्या तीरी आहेत त्यामुळे यांना कुकडी प्रकल्प असे संबोधले जाते.या सर्व धरणांनाची एकत्रित क्षमता 31TMC (उपयुक्त जलसाठा)आहे.वापरात न येणाऱ्या पाण्यासहीत 37TMC एवढी क्षमता कुकडी प्रकल्पाची आहे. शक्यतो दर वर्षी ही धरणे ताकदीने भरतात.याचा फायदा सीना खोऱ्यातील लोकांना होतो.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!