पानशेत धरण

पानशेत धरण

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.

पानशेत पूर

१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भा.प्र.वे.नुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.

पानशेत पूरग्रस्तांची कहाणी

पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणाऱ्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!