विराट कोहली हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू असून सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आहे.[१] उजव्या हाताने भारताच्या वरच्या फळीत खेळणाऱ्या[२] विराट कोहलीने फेब्रुवारी 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 64 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये 39 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके आणि 25 कसोटी शतके आहेत. २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेट खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स त्याच्या मुलाखतीत कोहलीबाबत म्हणतो की ह्याची फलंदाजी मला माझी आठवण करून देते.[३]
कोहलीने त्याचे एकदिवसीय पदार्पण ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केले,[२] आणि त्याने त्याचे पहिले शतक २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध इडन गार्डन्स, कोलकाता येथे १०७ धावा फटकावून साजरे केले. फेब्रुवारी २०१२ मधील श्रीलंकेविरुद्ध त्याच्या ८६ चेंडूंमधील नाबाद १३३ धावांच्या खेळीमुळे, भारताने ३६.४ षटकांत ३२१ धावांचा यशस्वी पाठलाग केला. कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियामध्ये केलेला हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[४][५]ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीच्या ह्या खेळीबद्दल म्हणतो "ही एकदिवसीय क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळी आहे".[६] कोहलीने २०१२ आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याची सर्वोच्च १८३ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पाकिस्तानचे ३३० धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यानंतर २०१३ मध्ये त्याने, वेस्ट इंडीज मध्ये त्रिकोणी मालिका खेळताना कर्णधार म्हणून त्याचे पहिले शतक झळकावले.[७] ऑक्टोबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दोन शतके झळकावली. त्यापैकी ५२ चेंडूतील नाबाद १०० धावांचे पहिले शतक हे भारतातर्फे सर्वात जलद एकदिवसीय शतक आहे.[८] नंतरचे ६१ चेंडूंतील शतक हे भारतातर्फे तिसरे सर्वात जलद शतक आहे. [९] त्याच्या २५ एकदिवसीय शतकांमधील १५ शतके दुसऱ्या डावात आली आहेत. यापेक्षा जास्त दुसऱ्या डावातील शतकांचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावे आहे (१७ शतके).[१०][११] आणि त्याने केलेल्या शतकांपैकी भारताने फक्त दोन एकदिवसीय सामने गमावले आहेत. मार्च २०१६ पर्यंत २५ एकदिवसीय शतके करून, सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चवथ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या पाचातील तो एकमेव फलंदाज सध्या कार्यरत आहे.[१२]
२०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर[२], त्याने पहिले शतक झळकावले ते जानेवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ॲडलेड ओव्हल येथे. २०१४-१५ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ११५ आणि १४१ धावा केल्या. एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारा तो चवथा भारतीय फलंदाज. [१३][१४] त्यास मालिकेमध्ये त्याची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत शतके करणारा तो पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. कसोटी मधील त्याची ११ पैकी ८ शतके ही भारताबाहेर केलेली आहेत. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये त्याने अजून पर्यंत शतक केलेले नाही; त्याच्या टी२० मधील सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० आहेत.[२]
सूची
चिन्ह
अर्थ
*
नाबाद
सामनावीर
भारतीय संघाचा कर्णधार
स्थान
ज्या स्थानावर फलंदाजी केली
मा/प/त
स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख
सामन्याचा पहिला दिवस
विजयी
भारताने सामना जिंकला
पराभूत
भारताने सामना गमावला
अनिर्णित
सामना अनिर्णित राहिला
(ड/ल)
डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी
सामना भारतात खेळवला गेला
परदेशी
सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ
सामना भारतात किंवा विरुद्ध संघाच्या देशात खेळवला गेला नाही