गुणक: 34°55′44″S 138°36′4″E / 34.92889°S 138.60111°E / -34.92889; 138.60111
ॲडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. (इंग्लिश: Adelaide) हे ऑस्ट्रेलियातील पाचवे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना सन इ.स. १८३६ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे गौना (इंग्रजीः Kaurna) नावाची आदिवासी जमात नांदत होती. येथे संरक्षण साहित्याचे उत्पादन होते तसेच होल्डन व मित्सुबिशी या मोटार उत्पादक कंपन्यांचेही कारखाने आहेत.