इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.[१][२] या दौऱ्यावर एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० (WT20I) सामने खेळविले जातील.[३] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने ऑस्ट्रेलियाच्या २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या मालिकेसाठी सामने निश्चित केले.[४]