न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १८ – २० जानेवारी १९५७
संघनायक उना पेसली रोना मॅककेंझी
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९५७ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला होता. या आधी मार्च १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केलेला. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ महिला कसोटी खेळले. उना पेसलीने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व रोना मॅककेंझीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले.

एकमेव महिला कसोटी ॲडलेड येथील किंग्ज कॉलेज ओव्हल मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी दुबळ्या न्यू झीलंड संघावर १ डाव आणि ८८ धावांनी विजय मिळवला.


महिला कसोटी मालिका

एकमेव महिला कसोटी

१८-२० जानेवारी १९५७
धावफलक
वि
३५४/९घो (१५०.१ षटके)
उना पेसली १०१
जीन कूलस्टन ४/९४ (४९.१ षटके)
९८ (५२ षटके)
रोना मॅककेंझी २७
बेटी विल्सन ३/२३ (१० षटके)
१६८ (१०६.१ षटके)(फॉ/ऑ)
जॉइस पॉवेल ४९
वॅल स्लॅटर ४/१३ (१०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १ डाव आणि ८८ धावांनी विजयी.
किंग्ज कॉलेज ओव्हल, ॲडलेड

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!