पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री हा भारताच्यापश्चिम बंगाल राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
१९४६ सालापासून आजवर केवळ ८ व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. १९७७ ते २००० ह्या २३ वर्षांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेज्योती बसू हे आजवरचे भारतामधील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असलेले नेते आहेत.
^१ ते ८ जुलै १९६२ दरम्यान सेन बंगालचे कार्यवाहू मुख्यमंत्री होते. त्यांनी ९ जुलै १९६२ रोजी पदाची शपथ घेतली.
^ abcdराज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. राज्याचे कामकाज केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालाद्वारे सांभाळले जाते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[४]