दिल्लीचा मुख्यमंत्री हा भारताच्यादिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाचासरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार केवळ दिल्ली व पुडुचेरी ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांनाच स्वतःचे सरकार बनवण्याची संमती आहे. भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख राज्यपाल असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात. परंतु दिल्लीची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
१९५२ सालापासून आजवर ८ व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. आम आदमी पक्षाच्याआतिशी विजयसिंह मारलेना ह्या दिल्लीच्या ८व्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
&-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000115.000000११५ दिवस
—
दिल्लीमधील राष्ट्रपती राजवट तपशील
दिल्लीमध्ये आत्तापर्यंत फक्त एक वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.
एकमेव कार्यकाळ : १४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : दिल्ली विधानसभेत जन लोकपाल विधेयक पारित न करु शकल्याने पदस्थ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. आम आदमी पक्ष व्यतिरिक्त कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करायची इच्छा नसल्याने अखेर ४ नोव्हेंबर २०१४ रोजी दिल्लीचे तत्कालीन राज्यपाल यांनी विधानसभा भंग करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचेकडे प्रस्ताव ठेवला. विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि नव्या निवडणूकीची घोषणा करण्यात आली. नवी विधानसभा आणि नवे सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.