गुणक: 30°15′N 120°10′E / 30.250°N 120.167°E / 30.250; 120.167
हांगचौ (मराठी नामभेद: हांगझाऊ ; चिनी: 杭州 ; फीनयीन: Hangzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चच्यांग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१० साली २.११ कोटी लोकसंख्या असलेले हांगचौ हे चीनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर होते. चीनच्या आग्नेय भागात पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या हांगचौ शहराची लोकसंख्या ८७ लाख आहे. शांघायपासून केवळ १८० किमी अंतरावर असल्यामुळे हांगचौ चीनमधील एक बलाढ्य आर्थिक व व्यापारी केंद्र आहे. तसेच येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटन हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.