सिताबर्डी मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्याअॅक्वा मार्गिकेवरील[१] दहावे आणि केशरी मार्गिकेवरील आठवे स्थानक आहे. मेट्रो रेल्वेचे पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग व उत्तर-दक्षिण मार्ग हे या स्थानकावर छेदतात. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. हे एक अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक आहे. निळ्या मार्गिकेतील स्थानकावर जाण्यासाठी येथून मार्गिका बदलता येते. तसेच, निळ्या मार्गिकेतून प्रवासी हा केशरी मार्गिकेवरील स्थानकावर जाण्यासाठी येथे आपला मार्ग बदलू शकतो. हे नागपूर मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.[२]) या स्थानकावर या मार्गास छेदणारा उत्तर दक्षिण हा मार्ग या मार्गाच्या उंचीपेक्षा सुमारे ९ मीटर कमी उंचीवर आहे.[३][४]