जयपूर मेट्रो ही भारतातील राजस्थानच्या जयपूर शहरासाठी असणारी एक जलद परिवहन प्रणाली आहे.[१]मानसरोवर ते चांदपोलबाजार या पहिल्या टप्प्याचे बांधकाम १३ नोव्हेंबर २०१०ला सुरू झाले.हा टप्पा ९.६३ किमी लांबीचा आहे. [२][३] हे बांधकाम सन २०१४ मध्ये पूर्ण झाले. कमिश्नर ऑफ मेटो रेल सेफ्टी यांची मंजूरी मिळाल्यावर, या मेट्रोची सेवा ३ जून २०१५ मध्ये मानसरोवर ते चांदपोल या मार्गावर प्रत्यक्षात सुरू झाली.[४]कोलकाता मेट्रो, दिल्ली मेट्रो, बंगळूरू मेट्रो, गुरगाव मेट्रो व मुंबई मेट्रोनंतरची ही भारतातील सहावी मेट्रो रेल्वे सेवा आहे. तसेच, तीन मजली उन्नत रस्ता व मेट्रो मार्गिका असणारी ही भारतातील प्रथमच मेट्रो सेवा आहे.
संदर्भ