नम्मा मेट्रो (कन्नड : ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೊ अर्थ:आमची मेट्रो ) अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन (बीएमआरसीएल) ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ला झाले.याची प्रथम मार्गिका बयप्पनहल्ली ते महात्मा गांधी मार्ग (एम.जी.रोड) या दरम्यान तयार झाली.[१] हे सध्या दिल्ली मेट्रो आणि हैदराबाद मेट्रो नंतरचे भारतातील सर्वात लांब मेट्रोचे नेटवर्क आहे. या मेट्रोमुळे बंगळूरू तील अती गर्दीच्या भागातील वाहतूकीत सुधारणा होईल व तेथील ताण कमी होईल असा अंदाज आहे.[२]
चित्रदालन
संदर्भ
हेही बघा
बाह्य दुवे