कल्वकुंतल चंद्रशेखर राव (तेलुगू: కల్వకుంట్ల చంద్రశేఖరరావు - कल्वकुंतल चंद्रशेखर राव; १७ फेब्रुवारी १९५४) हे भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले व माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्यावाहिल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत राव ह्यांच्या नेतृत्वाखाली टी.आर.एस.ने दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले.
पूर्वीचे जीवन
चंद्रशेखरराव यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५४ ला सिद्दिपेट जवळील चींतमडका या गावी झाला आहे. आणि हे गाव सद्या तेलंगणा राज्यात आहे. राव यांना ९ बहिणी आणि १ मोठे भाऊ होते. त्यांनी उस्मानिया विद्यापीठांतर्गत हैद्राबाद येथुन तेलगु भाषे मधे एम.एची पदवी प्राप्त केली.[१]
संदर्भ
बाह्य दुवे