सदानंद शांताराम रेगे

सदानंद रेगे
जन्म नाव सदानंद शांताराम रेगे
जन्म जून २१, १९२३
मृत्यू सप्टेंबर २१, १९८२
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, अनुवादित साहित्य

सदानंद रेगे (जून २१, १९२३ - सप्टेंबर २१, १९८२) हे मराठी कवी, भाषांतरकार होते.सदानंद रेगे यांचा जन्म आजोळी कोकणात राजापूर येथे झाला.पण त्यांच्रे बालपण मुंबईत दादर -माटुंगा परिसरात गेले.शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूल येथे झाले.१९४० मध्ये ते ११ वी एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले .बालपण पासून त्यांना असलेल्या चित्रकलेच्या आवडी मुळे त्यांनी सर ज.जी. कला महाविद्यालय येथे प्रवेश घेतला.१९४२ मध्ये ते मिल मध्ये डिझाईनरचे काम करू लागले .१९५८ मध्ये ते सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.ए. झाले.तर १९६१ मध्ये कीर्ती महाविद्यालयातून एम.ए झाले. त्यांनी काही वर्षे पश्चिम रेल्वेत नोकरी केली. सन १९६२ पासून माटुंगा येथील राम नारायण रुईया महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचेत अध्यक्ष होते .दि.२१ सप्टेंबर १९८२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.

पुस्तके

सदानंद रेगे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कथासंग्रह

  • जीवनाची वस्त्रे
  • काळोखाची पिसे
  • चांदणे
  • चंद्र सावली कोरतो
  • मासा आणि इतर विलक्षण कथा

कवितासंग्रह

  • गंधर्व
  • वेड्या कविता
  • देवापुढचा दिवा
  • बांक्रुशीचा पक्षी

अनुवादित पुस्तके

  • जयकेतू (रूपांतर)
  • राजा ईडिपस
  • बादशहा
  • ज्यांचे होते प्राक्तन शापित
  • ब्रांद
  • गोची

अनुवादित कविता

  • व्लादिमिर मायकोव्हस्कीच्या कवितांचा अत्यंत सुदर अनुवाद पँट घातलेला ढग

बालगीते

  • चांदोबा, चांदोबा
  • झोपाळ्याची बाग


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!