प्रा.डाॅ. शरणकुमार लिंबाळे (जन्मदिनांक १ जून, १९५६- हयात) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या लिखाणाने त्यांनी दलित साहित्यात भर घातली आहे. त्यांची 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' यांसारखी काही पुस्तके साहित्याच्या अभ्यासकांकडून महत्त्वाची मानली जातात.[१]
शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेली पुस्तके (सुमारे ४०)
- अक्करमाशी
- उद्रेक
- उपल्या
- ओ
- गावकुसाबाहेरील कथा
- झुंड
- दंगल
- दलित आत्मकथा - एक आकलन
- दलित पँथर
- दलित प्रेमकविता
- दलित ब्राह्मण
- दलित साहित्य आणि सौंदर्य
- दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
- पुन्हा अक्करमाशी
- प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र)
- बहुजन
- ब्राह्मण्य
- भारतीय दलित साहित्य
- भिन्नलिंगी
- राणीमाशी
- रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
- वादंग
- विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन
- शतकातील दलित विचार
- साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह
- सांस्कृतिक संघर्ष
- साहित्याचे निकष बदलावे लागतील
- हिंदू
- ज्ञानगंगा घरोघरी[२]
सन्मान आणि पुरस्कार
- नांदेडमध्ये १२-३-२०११ रोजी झालेल्या १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे होते.
- भोसरी (पुणे) येथे ३-४ जानेवारी २०१९ या काळात भरलेल्या २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना 'प्रा. रा.ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार' दिला गेला..
- "सनातन' या कादंबरीसाठी के. के. बिर्ला फाऊंडेशनचा "सरस्वती' पुरस्कार[३]
संदर्भ आणि नोंदी
मराठी साहित्यिक |
---|
अ | |
---|
आ | |
---|
इ | |
---|
उ | |
---|
ए | |
---|
ऐ | |
---|
ओ | |
---|
क | |
---|
ख | |
---|
ग | |
---|
घ | |
---|
च | |
---|
ज | |
---|
ट | |
---|
ठ | |
---|
ड | |
---|
ढ | |
---|
त | |
---|
|